web-ads-yml-728x90

Breaking News

दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ, गतिशील करणार – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक सुलभ, गतिशील करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. राज्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रियेत काळानुरूप सुधारणा आणि बदल आवश्यक असून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.मंत्रालय येथे जिल्हास्तरावर निर्गमित करण्यात येणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे आणि तालुकास्तरावर दिव्यांगांसाठी सुविधा उपलब्ध करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव हृषीकेश मोडक, आरोग्य सेवा संचालनालय सहसंचालक डॉ.नितिन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण उपसचिव प्र. ब. सुरवसे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.

No comments