0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर

उल्हासनगर शहरातील एका घरामधून ११ लाखांचा अवैद्य गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाचा साठा अन्न व औषध प्रशासन दक्षता विभाग आणि विठ्ठलवाडी पोलीसांनी संयुक्त पथकाने जप्त केला आहे. मात्र, छापेमारीची कुणकुण लागल्याने गुटखा माफिया फरार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात गुटखा माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्याता आला आहे. तर ज्या घरातून गुटखा जप्त करण्यात आला त्या घरमालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नवीन दुसेजा असे अटक केलेल्या घरमालकचे नाव आहे.

Post a Comment

 
Top