BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रस्तावानुसार ४७ नवीन धान्य गोदामे उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकरी आणि महिला बचतगटांपर्यंत पोहोचवावी. त्यामुळे नवीन गोदामांसाठी प्रस्ताव प्राप्त होऊ शकतील. याचबरोबर जुन्या पडीक इमारतींचे गोदामात रूपांतर करणे, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जुन्या गोदामाची दुरूस्ती करण्यात यावी व ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.शेतकऱ्यांच्या धान्य साठवणुकीसाठी मंडळ स्तरावर गोदामे उपलब्ध करण्याबाबत वेबिनारद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस वखार महामंडळाचे अध्यक्ष दिपक तावरे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, पोखरा योजनेचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, शेतकरी अॅड.निलेश हेलोंडे पाटील आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Post a comment