0

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी

भिवंडी उपविभागीय कार्यालयात गेल्या ३ वर्षापासून लिपिक या पदावर कार्यरत असणारे अरविंद चौघुले यांचा समारोप दिन साजरा करण्यात आला.गेल्या ३ वर्षापासून त्यांचे अधिकारी कार्यशैलीतून जनसामान्यांसाठी असलेले महत्वपूर्ण योगदान माणूसकीची जान करुन जात असल्याचे निदर्शनास आले आहे.गोरगरिबांना मदत ही भूमिका सदैव आपल्या मनात ठेवून शासनाच्या अटी-तटीचे,वरिष्ठ अधिकारी यांचे पालन करणारे अरविंद चौघुले यांच्या कार्याविषयी सर्व कार्यालयात प्रशंसेचा सुर घुमायचा.वेळोवेळी दिलेल्या कामाच्या आराखड्यात चोखबद्द काम त्यांनी केले आहे.श्री.चौघुले यांनी नितीमत्ता प्रामाणिक ठेवली असून आलेला सर्वसामान्य व्यक्ती निराशा हाती घेऊन जात नसायचा.अशा भिवंडी उपविभागातील श्री.चौघुले यांनी काही वैयक्तिक विषायान्वये सोलापूर जिल्ह्यात बदली करुन घेतल्याने त्या जिल्ह्यातही श्री.चौघुले हे त्याचप्रमाणे एकनिष्ठेने काम करतील जे काम त्यांनी आपल्या कारकिर्दीत भिवंडी उपविभागात लिपिक या पदावर राहून केले असा विश्वास भिवंडी उपविभागीय अधिकारी श्री.नळदकर साहेब,नि.नायब तहसिलदार श्री.विठ्ठल गोसावी,कुळवहिवाट शाखेचे अ.का.नानासाहेब राऊत,प्रमोद गवाळे,घायवट तात्या,ठाकरे भाऊसाहेब,श्री.गवान भाऊसाहेब व विभागीय अधिकारी,कर्मचारी वर्ग यांनी व्यक्त केले आहे.श्री.अरविंद चौघुले यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करुन त्यांचा समारोप घेण्यात आला.

Post a Comment

 
Top