web-ads-yml-728x90

Breaking News

येत्या वर्षात आरोग्याच्या उपाय योजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नाशिक

कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. आरोग्य विभाग, प्रशासन यंत्रणेने कोटेकोरपणे कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेवून लसीकरणासंदर्भात नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

नाशिक मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर येथील ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे आज कोरोना विषयक आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक  सचिन पाटील, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते.

 

No comments