0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

सेवेचे फळ मिळो वा न मिळो, भारतातील प्रत्येक व्यक्तींमध्ये करुणा, सेवाभाव व इतरांना मदत करण्याची उपजत भावना आहे. ‘सेवा परमो धर्म’ ही येथील शिकवण आहे. हा करुणा भाव व सेवाधर्म जोपासला तर आपण कोरोनापेक्षाही मोठ्या शत्रूला पराभूत करू शकू, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.मुलुंड युवक प्रेरणा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तर पूर्व मुंबई उपनगरांतील 22 कोरोना योद्धांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

Post a Comment

 
Top