0

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

ठाणे जिल्हापरिषद पशुवैद्यकीय विभागा मार्फत दिल्या जाणा-या पशुधन योजनेत मुरबाड प्रचायत समितीच्या अधिका-यांनी राजकीय आकासापोटी गोर-गरिब शेतकरी शासकीय म्हैशी गटापासून वंचित ठेवले आहे.

          सर्व कागदपत्र सादर केलेल्या कळमखांड येथील मारूती कापडी यांना डावळून राजकीय आकासाने लोकप्रतिनिधी यांच्या मर्जी नुसार योजनेचा लाभ दिला जातो. याकडे स्थानिक आमदारांनी लक्ष वेधुन वंचित शेतक-यांना लाभ द्यावा अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

          मुरबाड पंचायत समिती राजकारण्याचा अड्डा बनला. येथील अधिकारी टक्केवारी घेतल्याशिवाय काम करत नाहीत. मुरबाड पंचायत समिती कृषी विभागामार्फत शेतक-यांना फवारणी यंत्र देण्यास टाळाटाळ करणा-या बडगुजर अधिका-यावर कारवाई करा त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी भाजीपाला करण्यास वंचित राहीला आहे. शेतक-यांना फवारणी पंप दिले जात नाहीत. शेतक-याचे साहित्याची खोटी बिले तयार करून अधिकारी गैरव्यवहार करीत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई न केल्यास श्रमजिवी संघटना आंदोलनात्म्क जाब विचारतील असा इशारा श्रमजिवी संघटनेचे ठाणे जिल्हा कातकरी संघटक पंकज वाघ यांनी दिला आहे. म्हैश गट योजना फवारणी पंप शेतक-यांना देण्यासाठी सभापतींना विचारणा केली असता मी पहातो असे उत्त्र दिले गेले आहे.

Post a Comment

 
Top