0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – परभणी

महाराष्ट्रातील मांसाहारी लोकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. 3 दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच (Bird flu) झाल्याचं आता निष्पन्न झालं आहे. येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

Post a Comment

 
Top