web-ads-yml-728x90

Breaking News

पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोना महामारीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करीत जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी केले ही कौतुकास्पद बाब असून यापुढेही पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे कार्य सातत्याने करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त राजभवन येथे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार तसेच समाजसेवाकांचा सत्कार करण्यात आला.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, देशभरात पत्रकारांचे एक वेगळे स्थान आहे. ‘जहा न पहुंचे सरकार, वहा पहुंचे पत्रकार’ असे पत्रकारांबद्दल सांगतात. डॉक्टर्स, पोलीस, याप्रमाणेच कोरोना काळात पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले. देशावर कोणतेही संकट आले तर मतभेद दूर सारून एकजुटीने काम करण्याची देशाची संस्कृती आहे. त्याप्रमाणेच पत्रकारांकडून आपले कर्तव्य चांगल्यारितीने नेहमीच जपले जाईल, असा विश्वास श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केला.

No comments