web-ads-yml-728x90

Breaking News

मुख्यमंत्र्यांकडून सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पाहणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

सिरमची कोरोना लस सुरक्षित आहे. कोव्हिशिल्ड लस उत्पादनाला फटका नाही. आग प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागलेल्या आगीची  पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच सिरम इन्स्टिट्यूटच्या टीमशी त्यांनी संवाद साधला.विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे,सिरमचे अदर पूनावाला,  विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्यमंत्री यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

No comments