0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले.

येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारा जिल्हाधिकारी  शेखर सिंह आणि सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (व्हिसीद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top