web-ads-yml-750x100

Breaking News

गोवंश हत्या बंदी सह गो तस्करावर कार्यवाही करा - राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत चंद्रपूर विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार यांची मागणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – चंद्रपूर

विदर्भात मागील काही दिवसापासून मोठ्याप्रमाणात गोवन्श तस्करी करून कत्तलखान्यात नेल्या जात आहे. हि तस्करी रोखण्यासाठी आम्ही पोलिसांच्या मदतीने कार्य करीत आहोत. परंतु गो तस्करीबाबत कानून मजबूत असूनही पोलिसांकडून कमजोर केल्या जात असल्यामुळे पकडण्यात आलेले गोवन्श ते न्यायालयातून सोडवीण्यात येत आहे. गोवन्श हत्याबंदी 2015 कायदया अंतर्गत कलम 5(अ) नुसार कोणताही व्यक्ती गाय किंवा बैल हत्याच्या उद्देशातून किंवा हत्या करण्यासाठी राज्यात किंवा राज्याबाहेर नेऊ शकत नाही.कलम 5 (ब) नुसार कोणतेही गोवन्श खरेदी -विक्री हत्यांच्या उद्देश्याने करीत असेल तर ते करू शकत नाही. अगर हत्यांच्या उद्देश्याने खरेदी - विक्री केल्यास त्या व्यक्तीच्या विरोधात अधिनियम 9 नुसार 5 वर्षाची सजा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा आहे. तरीपण गो तस्करी मोठयाप्रमाणात होत आहे. महाराष्ट्र सरकारने तसेच पोलीस विभागाने गो तस्करी करणाऱ्यवर 1960 चा जुना कायदा न लावता नवीन सुधारीत गोवन्श हत्याबंदी 2015 नुसार कार्यवाही केल्यास गोहत्या बंदीस मदत होईल.असे राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे, गृहराज्य मंत्री व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ चंद्रपूर विभाग अध्यक्ष नन्दु गट्टूवार,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर अरोरा,चंद्रपूर महामंत्री दिपक रेड्डी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments