web-ads-yml-728x90

Breaking News

भेदाभेद मुक्त मानव विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 09:30 वाजता चळवळ गीतांनी सुरुवात झाली.उपोषणाला व मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय साखळी उपोषणाला बसलेल्या चिरंजीवी राज्यकार्यवाह एशवर्या तोडकरी,चिरंजीवी राज्यप्रवक्ता पुष्कर धुरी , चिरंजीवी सदस्य साई लवांडे, रितिका लोखंडे व विद्यार्थी भारती सदस्य दिव्या सनानसे, गंगा गुंडाइया ... यांनी या मोहिमेला सदिच्छा व पुढे सोबत लढण्याची गवाही दिली अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय कार्यवाह जितेश पाटील यांनी दिली.

उपोषणाची सुरुवात विद्यार्थी भारती माजी राज्यध्यक्षा , वाघिणी संघटनेच्या अध्यक्षा तसेच जनता दलाच्या मुंबई महासचिव मा. ज्योती ताई बडेकर यांच्या हस्ते पाणी पाजून करण्यात आली आणि पूजा गणाई यांचे कौतुक करत भाषणाची सुरुवात करत समाजातील अनेक भेदाभेदांवर अहिंसेने घाव करण्यासाठी ह्या मोहिमेची अत्यंत गरज असल्याचे सांगत पूजा ने उचललेल्या पावलांचे कौतुक व अभिनंदन केले आणि मोहिमेला पाठिंबा दिली अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय सचिव प्रणय घरत यांनी दिली.

पूजा जया गणाई  यांनी भाषणाची सुरुवात करत आज माझ्या उपोषणाचे तिसरे दिवस  असून साखळी उपोषणाला बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले व ह्यांच्या मुळे माझी ताकद आणखीन वाढली , मला या मोहिमेला विरोध करणाऱ्यांचे आभार मानावे वाटते कारण त्यांच्यामुळे माझी या मोहिमेच्या गरजेची तीव्रता आणखी वाढत आहेत आणि सोबतच आणखी तरुण हात देखील पुढे येत आहेत .  माणूस म्हणून जगताना समस्त मानवी मूल्यांचा या मोहिमेला जोडलेल्या माझ्या सर्व साथींनी आज मानवी मूल्यांचा पुरस्कार केला व ती स्वीकारण्याची ग्वाही दिली याचा मला अभिमान आहे. अनेक अनोळखी तरुण मुलामुलींचे मला फोन , मॅसेज ,ट्विट येत आहेत व ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमची लढाई ही मानवतेची लढाई आहे  आणि आपण नक्की यशस्वी होऊ. 

      तसेच 90 च्या दशकातील रिंकु पाटील आणि हरेश पटेल यांच्या एकतर्फी प्रेमातून 18  वर्षाच्या रिंकू पाटील हिला शाळेत जाऊन तिला जिवंत जाळण्याची घटना  मांडत पुरुषी मानसिकतेचा निषेध केला आणि यासारख्या घटना आजही घडतात फक्त त्या सगळ्याच घटना आपल्या समोर येत नाही आणि हे घडूच नये म्हणून हा प्रयत्नशील पाऊल मी उचलत आहे यातून शेवटपर्यंत लढण्याचा प्रण  मी व माझ्या साथींनी घेतले आहे. आणि आम्ही लढत राहू. अशी माहिती संघटनेच्या राष्ट्रीयप्रवक्ता श्रेया निकाळजे यांनी दिली.

      आज कार्यक्रमात उपस्थित तरुण मुलामुलींसोबत मानवतेच्या दृष्टीने वाटचाल करणारे स्वनिर्मित खेळ घेतले. ज्यातून अनेक मुलांना व्यक्त होऊन आपली मतं मांडता आली.

       रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (जनरल कामगार  युनियन ) चे वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते आणि  परखंदी गावातले शिक्षक (जिल्हा परिषद शिक्षक) सचिन गाढवे सर तसेच( पी. एस.आय.) संजय  मोटकर सर , बोपर्डी गावात राहणारे सामाजिक कार्यकर्ते भरत काळे  ह्यांनी देखील आजच्या उपोषणाला उपस्थिती दाखवली आणि ह्या मोहिमेला  पाठिंबा दर्शवला आहे.

No comments