0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यातील शासकीय रुग्णालये आणि शासकीय महाविद्यालया अंतर्गत रुग्णालयाच्या अग्नि सुरक्षा यंत्रणेबाबत आढावा घेतला.विभागाच्या शासकीय इमारतींचे दर दोन वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात यावे, अग्नि सुरक्षेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांच्या माध्यमातून सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश श्री.पाटील यांनी दिले. तसेच त्रयस्थ संस्थेकडून अग्नि सुरक्षा यंत्रणेबाबत फ़ायर ऑडिट करुन त्यातील त्रुटी सुधारण्यासाठी अर्थसंकल्पिय तरतूद करण्यात यावी अशा सूचनाही राज्यमंत्री श्री.पाटील यड्रावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.रुग्णालयाच्या अग्नि सुरक्षेचा विषय हा सर्वात महत्त्वाचा असून यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी विविधस्तरावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.यावेळी आरोग्य सेवा संचालनालय सहसंचालक डॉ.नितिन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण उप सचिव प्र. ब. सुरवसे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसचिव संजय कमलाकर आदि अधिकारी उपस्थित होते.

 

Post a comment

 
Top