0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काही प्रमुख मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स या ठिकाणीही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच दादर स्टेशनवरीही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक तिरंगी रंगात रोषणाई करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला पालिकेतर्फे आकर्षक रोषणाई करण्यात आली. दरवर्षी केली जाणारी ही रोषणाई संपूर्ण मुंबईकर आणि तरुणाईचे आकर्षण ठरत आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत आहेत.

Post a Comment

 
Top