web-ads-yml-728x90

Breaking News

मृत बालकांच्या मातांच्या आरोग्याची काळजी घ्यावी – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – भंडारा

भंडारा येथील सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांची नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन घटनेची पाहणी केली.जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक प्रदीप काठोळे, सिडीपीओ राहूल निपसे तसेच अन्य विभागाचे अधिकारी यावेळी  उपस्थित होते.

No comments