0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

फोर्ट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top