0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन यांच्या २०२० च्या पुस्तकामध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. २०१८ आणि २०१९ वर्षामध्ये ५ हजार पेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगर पालिका मॅनिंग मोपिंग स्वछता कामगारांना फिटनेस, नैराश्य आणि चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेल्या प्रशिक्षणा साठी त्याचबरोबर ८०० पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्याबद्दल तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स करून राज्याचे आणि देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी २०२० च्या पुस्तकामध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद कराटे एक्स्पर्ट म्हणून केली आहे.

 

Post a comment

 
Top