web-ads-yml-728x90

Breaking News

दुर्घटना घडल्यावर शासन जागे होते महाराष्ट्रातील सर्व खाजगी हॉस्पीटलचे फायर ऑडीट करा - जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

एखादी घटना घडल्यावर सरकार लोकप्रतिनिधी जागे होतात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश होतात भरपार्इ देवून दु;खावर फुकट घालतात मात्र नागरिकाच्या समस्या निर्माण होण्यापुर्वी भयंकर घटनाघडण्यापुर्वी सरकार संबधित वरिष्ठ अधिकारी का दक्षता घेत नाहीत असा सवाल विकासमंच एनजीओ संस्थेचे संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार यांनी करून महाराष्ट्रातील सर्व खाजगी रूग्णालय शासकीय कार्यालय कंपन्या यांचे फायर ऑडीट करावे अशी मांगणी सरकारकडे केली आहे.दोनवर्षापुर्वी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात शॉटसर्किटमुळे आग लागली होती त्यावेळी फायर ऑडीट करण्याचे आदेश दिले होते.त्याचप्रमाणे महाड पुलाची दुघटना घडली त्यावेळी महाराष्ट्रातील सर्व जुन्या पुलाचे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते ज्या कंपन्यात आग लागली होती त्यावेळी सुध्दा फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होतेमात्र केवळ आदेश पैशाची भरपार्इ उच्चस्तरीय चौकशी यापलीकडे काही होत नाही.अधिकारी कर्मचार्‍यांचे मासिक वार्षिक आहवाल खोटे पाठवतात त्याची चौकशीसाठी एक स्थानिक नागरिकासह समिती तयार केली पाहिजे शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी मनमानी करतात सेवा हमी कायदयाने काम करत नाहीत याकडे सत्ता कोणाची असो सगळेच दुर्लक्ष करतात परंन्तू गेल्या 30 वर्षात अधिकारी कर्मचारी तात्काळ निलंबित झालेले नाहीत शासनाने सामान्य तक्रारीना केराची टोपली दाखवून केवळ चौकशाचा फार्स पुढे केला असून शासनाने महाराष्ट्रासह ठाणे जिल्हयातील सर्व शासकीय खाजगी रूग्णालयात फायर ऑडीट करावे दवाखाने परवाने रस्त्यावर देवू नये दवाखाण्यात फार्मशी कर्मचारी आहेत किंवा नाहीत याची चौकशी करावी मेडीकलची चौकशी करावी प्रत्येक दवाखाण्याची चौकशी करून रूग्णाची होणारी लयलुट थांबवावी मृत्युचा प्रमाण थांबवावा अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.

No comments