0

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासुन काही कोटीचा भ्रष्टाचार झाला असुन बोगस निकृष्ट कामाच्या नांवे कोटी रूपायाच्या कामाची अनधिकृत गाले बांधकामाची टक्केवारी वाटून घेणार्‍या अधिकारी आणि ठेकेदारानी आता टेंडर इस्टीमेन्ट रेट वाढवुन मोठा घोटाळा केला आहे.मागील नगरसेवकांचा कालावधी संपला त्यांच दिवशी मुरबाड शहरात कोटी रूपायाच्या कामाचे भुमिपुजन लोकप्रतिनिधीच्या हस्ते करण्यात आले.सदर इटेंडर इतर ठेकेदारानी भरले होते.त्यांना रिजेक्ट करून माजी नगराध्यक्ष यांनी भरलेल्या टेंडर मंजुर करून त्याला इस्टीमेन्ट रेट वाढवुन दिले आहेत परंन्तु मुरबाड मधील 22 कोटीची कामे त्याच माजी नगराध्यक्ष यानी केली असुन तो भाजपाचा नगराध्यक्ष असल्याने त्याच्यावर कारवार्इ झाली नाही त्यांनी शहरातील कामे पुर्ण केलेली नाहीत अधिकार्‍यानी इस्टीमेन्ट प्रमाणे कामे करून न घेता पुढील नगरपंचायतसाठी पैसा जमा करण्याचा धंदा सुरू केला असुन महाविकास अघाडी भाजपाच्या भ्रष्टाचाराला पाठबळ देत आहे असे चित्र दिसते.बागेश्‍वरी तलाव येथील वनविभागाची जागा आहे तेथे पर्यटण स्थळ उभे केले आहे.त्यासाठी निधी कोणी दिला निकृष्ट कामे कोणी केली त्याची चौकशी गुलदस्त्यात असुन मुरबाड नगरपंचायत असो की सार्वजनिक बांधकाम विभाग दोन्ही कडील ठेकेदारी नेते पुढारी लोकप्रतिनिधी यांचे हौश मौज निवडणुका कार्यक्रम राबवण्यासाठी भ्रष्टाचार मक्तेदारी बँक म्हणुन वापर केला जात आहे.मुरबाड नगरपंचायत मधील नगरसेवकाची मुदत संपल्यावर त्याच्याच प्रभागात रस्त्याची कामे काढुन निवडणुकीचा फंड जमा करण्याचा धंदा सुरू आहे त्याची चौकशी करून मुरबाड नगरपंचायतीचे टेंडर भरणे अधिकार काढुन ठाणे नगररचनाकडे दयावे अशी मांगणी होत आहे.

Post a Comment

 
Top