web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यातील वस्त्रोद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या समन्वयातून सोडविणार – राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील वस्त्रोद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लवकरच वस्त्रोद्योग विभागाशी  संबधित उद्योग, ऊर्जा आणि वित्त व नियोजन विभागांच्या एकत्रित बैठकीचे लवकरच नियोजन करणार असल्याचे राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या व अडीअडचणी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत याकरिता राज्यमंत्री यड्रावकर यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठक पार पडली. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्यासह वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव ड.ल. खरात, सुरेंद्र तांबे, इंचलकरंजीचे सुभाष मालपाणी  आणि संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments