0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.रस्त्यांवरील नियम पाळताना किंवा रस्ते क्रॉस करताना ज्या सोयी-सुविधा असतात त्यात सहजता हवी, त्याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, देशाच्या अपघात यादीत महाराष्ट्राचे नाव येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.

Post a Comment

 
Top