web-ads-yml-728x90

Breaking News

नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.सामंत यांच्या हस्ते झाले.

संसदेच्या केंद्रीय सभागृहात दि. १२ जानेवारी, २०२१ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या पार्श्वभूमीवर राज्यपातळीवरील स्पर्धा नेहरू युवा केंद्र, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय कार्यालय पुणे यांच्यावतीने गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी श्री. सामंत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

No comments