0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायतीचे विकास कामे ईटेंडर मध्ये मनमानी निर्णय घेणा-या ओसरमाला शाखा अभियंताच्या कारभाराची चौकशी करून मुरबाड शहरातील रस्ते, गटारी, ईमारती, शौचालय कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी राज्यसरकाराकडे केली आहे.

 ई टेंडरींग ऑनलाईन असताना त्यामध्ये हेराफेरी करून निर्णय घेतले जातात काय ? स्थानिक नगरसेवकांना ठेकेदारी मिळवून देण्यासाठी ओसरमाला यांच्या पुढाकार असतो काय ? अशी अनेक कारणे समोर येणार आहेत. शाखा अभियंता विकास कामाची ठेकेदारी सुरू आहे. त्या कामावर हजर नसतात त्यांचा गैरफायदा ठेकेदार घेत असून नगरसेवकच ठेकेदारी करत असल्याचे समोर आले असून नित्कृष्ठ् मनमानी पध्दतीने मरीआई मंदीर समोर बांधलेली आरसीसी गटार नागरिकांच्या तक्रारीने तोडून टाकल्याचा पुरावा समोर आला आहे.

Post a comment

 
Top