web-ads-yml-728x90

Breaking News

पाडाळे धरण ग्रस्ताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते धनादेश वाटप आपल्या पुढायानी बोध घ्यावा

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

गेली 3 वर्षे पाडाळे धरणात भुसंपादन झालेल्या जमिनीचे शेतकरी सार्‍या राजकीय पुढारी लोकप्रतिनिधी अधिकार्‍याकडे टाहो फोडुन मोर्चे आंदोलने करत होते मिडीया शेतकर्‍यची बाजू मांडत होते तरीही शेतकर्‍याना जमिनीचा मोबदला मिळाला नाही हाच मोबदला शेतकर्‍याच्या विनंतीने थेट राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुरबाड कराना गांवात जावुन दिला त्यांच्या समाजसेवा न्यायीक भुमिकेचा आदर्श आमच्या ठाणे जिल्हयातील ठेकेदार फेम नेत्यानीे घ्यावा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.ज्यांनी शेतकर्‍याची बाजु मांडली त्यांना शेतकयानी धन्यवाद दिलाच मात्र त्यांची समाजसेवा ठेकेदार पुढार्‍याना चपराकही ठरली आहे.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आम्ही मालक नाहीत सेवक आहोत शेतकर्‍यासोबत आहोत शेतकर्‍यांच्या समस्याची जाण आहे.अशा शब्दात जिल्हयातील ठेकेदार पुढार्‍याना चपराक देवुन गेले.यावेळी वनहक्कदावे संबधी सेलक्युलरचे रविंद्र चंदने यांनी निवेदन दिले त्यानाही आश्‍वासीत करून खाजगी वनहक्क दावेदाराना न्याय देण्याचे आश्‍वसन दिले.यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुरबाडच्या पाडाळे धरणग्रस्त बांधवाना न्याय मिळावा म्हणुन दिवंगत तानाजी तात्या घरत यांच्या आंदोलनाच्या कार्याची आवर्जुन दखल घेतली. राज्याचे विधीमंडळ अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत सर्व पक्षिय नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments