web-ads-yml-728x90

Breaking News

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वांद्रे येथे ग्रंथालय विभागाची आढावा बैठक श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने होत असल्याने अडचणी येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत तक्रारी येत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम ग्रंथालयांच्या नावावर जमा होते. संस्थेचे पैसे संस्थेला मिळाले पाहिजेत व कर्मचाऱ्यांचे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे आवश्यक आहे. तसेच या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने झाले तर त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच या कर्मचाऱ्यांना शासनमान्य ग्रंथालयांचे ग्रंथालय ओळखपत्र देण्याच्या सूचनाही यावेळी श्री. सामंत यांनी दिल्या.

No comments