web-ads-yml-728x90

Breaking News

महाआवास अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करा- पालकमंत्री

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

प्रत्येकाला हक्काचा निवारा हवा असतो. पक्क्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली महा आवास ग्ग्रामीण  अभियानाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करून गरीब कुटुंबाच्या घराचे स्वप्न साकार करा असे निर्देश मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज महा आवास अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते  घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष  सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, भाऊसाहेब दांगडे, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपस्थित होते.

      “सर्वासाठी घरे 2022”  हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून त्याअनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केलेला आहे. त्याकरीता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत  “महा आवास अभियान-ग्रामीण” राबविणेत येत आहे.   त्याअनुषंगाने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी 20 नोव्हेंबरछ 2020 रोजी आवास दिनाचे औचित्य साधुन राज्यस्तरीय शुभारंभ कार्यशाळेला संबोधित केले. ठाणे जिल्हयात सन 2016-17 ते सन  2020-21 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 6626 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी 5695 एवढी घरकुले पुर्ण करण्यात आलेली आहेत. 86 % घरकुलांचे काम पुर्ण झालेले आहे. 931 अपुर्ण घरकुले अभियान कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम जमाती घरकुल योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2016 ते 2019-20 पर्यंत एकूण 3495 घरकुलांना मंजूरी देण्यात आली असून 2761 घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत. 79% घरकुलांचे काम पुर्ण झालेले आहे. उर्वरीत 734 अपुर्ण घरकुले अभियान कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने  केले आहे.

 

No comments