web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी शाखा अभियंता यांचा प्रताप;माजी नगराध्यक्षाला मॅनेज टेंडर

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

ठाणे जिल्हयातील मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी शाखा अभियंता हे टेंडर मॅनेज करून माजी नगराध्यक्षाला देत असून ऑनलार्इन कागदपत्र गृहीत धरत नाहीत कोणाला टेंडर भरून देत नाहीत.निकृष्ट दर्जाची कामे करून अपुर्ण कामाची बिले काढुन कोटी रूपायाचा भ्रष्टाचार करतात अशा मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ शाखा अभियंता ओसरमाला यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवार्इ करावी अशी मांगणी नागरिकांनी केली आहे.मुरबाड शहरात कोटी रूपायाचे निकृष्ट रस्ते तयार करून टक्केवारी घेवुन कामे केले जातात स्थानिक एका माजी नगराध्यक्ष सर्व कामे टक्केवारी देवुन करत असुन आम्ही निधी आणतो आम्हीच कामे करणार असे सांगुन दहशत पसरवत आहे.महाविकास अघाडीच्या राज्यात भाजपाची बोगस कामाची ठेकेदारी सुरू असताना महाविकास आघाडीचे सरकार त्यांची चौकशी करून कारवार्इ करत नाहीत.एकाच रस्त्यावर पुन्हा पुन्हा टेंडर काढुन कोटीचा भ्रष्टाचार केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याचा भ्रष्टाचार

मुरबाड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे हे सुध्दा टेंडर मॅनेज करून बोगस कामे करणार्‍या ठेकेदाराच्या कामाची बिले काढतात कामे अगोदर करून घेवुन नंतर टेंडर काढतात सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह तसेच पळू सोनवळे यासह अनेक कामे अगोदर झाली आहेत.त्यावरच टेंडर काढुन इतर कोणी टेंडर भरू नये अशी ताकीद देवुन ठेकेदाराकडुन टक्केवारी घेवुन कामे न केलेल्या एम बी तयार करणे बिले काढणे टेस्ट रिपोर्ट खोटे बनवणे असे उद्यौग करतात त्याची माहिती सुध्दा माहिती अधिकारात देत नाहीत.गेल्या दोन वर्षापुर्वीची कामे झाली नाहीत त्याची बिले काढली आहेत त्या सर्व कामाची चौकशी करावी ठाणे येथील टेंडर क्लार्क निकम एक टक्का घेवुन टेंडर मॅनेज करून देत असल्याची चर्चा असुन त्याची चौकशी गुप्तचार विभागामार्फत करावी अशी मांगणी होत आहे.

No comments