web-ads-yml-728x90

Breaking News

गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – भंडारा

राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.पूर्व विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पस्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आयोजित बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते.

No comments