web-ads-yml-728x90

Breaking News

गुन्हेगारांचा कर्दनकाळ मुरबाडचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी अवैध धंदेवाल्याना आळा घालून गोरगरीब सामान्य जनतेला संरक्षण देणार्‍या कार्यत्पर वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे यांनी ग्रामपंचायत निवडणुका शांततेने पार पाडल्या आहेत.काही गांवात अत्यंत सवेदनशिलता निर्माण झाली होती त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवुन गुन्हेगार वृत्तीला आळा घातला आहे.तसेच भारत वार्इन शॉप मधुन दारू घेवुन शेजारी बेवडा धिंगाणा घालणार्‍याना चांगलाच चोप दिला आहे.ग्रामीण भागात वाढती विदेशी देशी दारूची दुकाने पानटपर्‍या किराणा दुकाने बनली आहेत.त्यांच्यावरही कारवार्इ सुरू असुन मुरबाड तालुका चार्‍ेया अवैध धंदे हाणामार्‍या गुन्हेगारी मुक्त करण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षक दत्तात्रय बोराटे यांचा सिहांचा वाटा आहे.येथील पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या नेतृत्वाखाली व पो.निरिक्षक दत्तात्रय बोराटे जनसामान्याना समाधान सुरक्षा देत आहेत.मुरबाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक कर्मचारी हे सुध्दा जनसामान्याना हवे तसा दिलासादायक न्यायीक काम करत आहेत.

No comments