BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यातील लघु-सूक्ष्म व मध्यम (एसएमई) उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभाग व बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील दालनात उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच बीएसईतर्फे अजय ठाकूर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे राज्यातील लघु-सूक्ष्म तसेच मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना भांडवल उभारणीसाठी पुरेसे पर्याय उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.बीएसईचे प्रमुख अजय ठाकूर म्हणाले की, ‘या कराराद्वारे आम्ही राज्यातील विविध एसएमई, त्यांचे प्रतिनिधी आणि उद्योग संघटनांपर्यंत पोहोचून त्यांच्यात जनजागृती करणार आहोत. मागील दोन वर्षांत ३३१ लघु उद्योगांनी शेअर बाजारातून सुमारे २२ हजार कोटी इतके एकत्रित भांडवल गोळा केले. त्यामुळे अल्प खर्चात त्यांच्या उद्योगवाढीच्या योजना कार्यान्वित करता आल्या. छोट्यांना मोठे होण्याची संधी मुंबई शेअर बाजारामुळे सहज उपलब्ध झाली आहे’, असेही श्री.ठाकूर यांनी सांगितले.
Post a comment