0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहीम बीच येथील बीच रिनोवेशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क रिनोवेशन, दादर टिळक ब्रीज ट्रॅफिक मॅनेजमेंट व वीर कोतवाल उद्यान रिनोवेशनच्या कामांची पाहणी केली. यावेळी या कामांच्या प्रस्तावांवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी या पाहणी दौऱ्याची सुरुवात माहीम बीचपासून केली. माहीम बीच येथे नवीन सी फेस तयार केला जात असून एकूण २ हजार ४६० चौरस मीटर जागेचा हा बीच नव्याने विकसित केला जात आहे. श्री. ठाकरे यांनी यापुर्वी येथील वृक्षारोपणाच्या अभियानाची सुरुवात केली होती. या मोहीमेतून येथे जवळपास एक हजार मोठे वृक्ष व २ हजार २०० छोटी झुडपे लावली गेली आहेत. ज्यामुळे पर्यटकांना हरित बीचचा आनंद लुटता येणार आहे. या बीचनजीक करण्यात येत असलेल्या सी फेसवर ओपन जीम देखील बनवली जाणार आहे. तसेच वॉच टॉवर सारखी अनोखी कल्पना येथे साकार होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Post a comment

 
Top