web-ads-yml-750x100

Breaking News

भादाणे गावातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी कुमारी भक्ती दिपक हांडोरे हिच्या हस्ते झेंडावंदन व ध्वजारोहणाचा मान

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

राज्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेमध्ये झेंडावंदन व ध्वजारोहणाचा मान विद्यार्थ्यांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय मा सरपंच..श्री.संजय हांडोरे पाटील यांच्या प्रयत्नातून झाल्याने या निर्णयाचे स्वागत...राज्यभरात होत असून *झेंडावंदन भादाणे पॅटर्न* सर्व राज्यात लागू करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी व विविध सामजिक संघटनेच्या मध्येमातून महाराष्ट्र शासनाला निवेदनाद्वारे होत आहे... जिल्हा ठाणे  मुरबाड तालुक्यातील  भादाणे गावात १५ ऑगस्ट २०१५ मध्ये सुरू झालेली ही अनोखी व प्रेरणादाई संकल्पना आज  गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना देणारी  आणि  त्यांच्या आई वडिलांना मान सन्मान देणारी ठरली आहे....त्याच बरोबर गावातील झेंडावंदन करण्यावरून होणारे वाद...हेवेदावे....तसेच प्रत्येक गावात चालत आलेली खोट्या  श्रेयवादाची परंपरा.रुसवे फुगवे..या सर्व वाईट प्रथाना चपराक देणारी ठरली आहे.... आदर्श निवडणूक आचारसंहिता वेळेस ध्वजारोहण करताना गावातील कोणत्या व्यक्तीला झेंडावंदनाचा    मान द्यावा हा प्रश्न शिक्षका समोर कायम  असल्याने.. तसेच...राष्ट्रीय सण साजरे करत असताना विद्यार्थ्यांना देशप्रेम देशभक्ती शिकवायची की झेंडावंदन चालू असताना वाद मिटवावेत या द्विधा मनःस्थितीत असलेल्या शिक्षकांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.. प्रत्यक्ष झेंडावंदन चालू असताना  तसेच काही दिवस अगोदर गावात वादाचे राजकारण चालू असते त्याचा  बालमनावर फार मोठा परिणाम होत असे....आणि हा सर्व परिणाम त्यांच्या करीयर वर होत असतो असे  होऊ नये म्हणून..विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीकरिता...गुणवत्ता विकासाकरिता...व  गावातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याकरिता भरपूर मेहनत घेणाऱ्या पालकांकरिता. हा झेंडावंदन व ध्वजारोहणाचा क्रांतिकारी निर्णय घेणारे भादाणे  गावाचे सुपुत्र श्री संजय हांडोरे पाटील यांनी अनेक अश्या  सुंदर संकल्पनां गावाकरिता प्रत्यक्षात  राबविल्या आहेत.....तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करताना तत्कालीन मुख्याध्यापक श्री राजाराम कंटे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते....या वर्षीचा प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा व ध्वजवंदन  करण्याचा मान इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून भादाणे गावातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी कुमारी भक्ती दिपक हांडोरे (83%टक्के मार्क) हिच्या हस्ते व तिच्या आई वडिलांच्या सोबत ध्वजारोहणाचा मान मिळणार आहे.आतापर्यंतचे झेंडावंदन ध्वजारोहण  चे मानकरी.....

१) विशाल रामचंद्र शेलवले(१५ ऑगस्ट २०१५ एसएससी)

२) अमित नारायण यशवंतराव(२६ जानेवारी २०१६ एचएससी)

३) स्वराज ज्ञानेश्वर शेलवले(१५ ऑगस्ट २०१६ एसएससी)

४) विद्या बाळकृष्ण शेलवले(२६जानेवारी२०१७ एचएससी)

५) भावेश गोविदं शेलवले(१५ ऑगस्ट२०१७ एसएससी)

६) भावना जयवंत सोनावळे(२६ जानेवारी २०१८ एचएससी)

७) भुषण चितांमण शेलवले(१५ ऑगस्ट२०१८ एसएससी)

८) स्वराज ज्ञानेश्वर शेलवले(२६ जानेवारी २०१९ एचएससी)

९) अक्षदा नारायण यशवंतराव(१५ ऑगस्ट२०१९ एसएससी) 

१०).कल्पना गौतम धनगर (२६जानेवारी २०२० एचएस सी)

११),सहील जयवंत शेलवले.(१५ऑगस्ट २०२० एस एस सी)

१२).भक्ती दिपक हांडोरे (२६ जानेवारी २०२१ एचएससी)

 या अनोख्या व क्रांतिकारी निर्णयाचे स्वागत आणि अनुकरण   शीवळे उमरोली (पी). मडकेपाडा खेवारे,उचले,भिवंडी येथील सांगे नांदकार. शहापूर येथील शिळ गावांनी केले असूनया अनोख्या निर्णयामुळे मुळे संजय हांडोरे पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments