web-ads-yml-728x90

Breaking News

निवासी डॉक्टरांनी रुग्णांना जीवदान देऊन मोलाचे कार्य केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांची सेवा करण्याचे मोलाचे कार्य केले असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) च्या वतीने राजभवन येथे राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्यावेळी आपण रुग्णांची सेवा करता त्यावेळी रुग्ण मनापासून आपल्याला आशिर्वाद देतात. रुग्णांकरिता डॉक्टर देवदूत असतात.सर्व निवासी डॉक्टरांनी ध्येय्य, समर्पण भाव व निष्ठेने कार्य केल्यामुळेच देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला. नवा कोरोना विषाणूवर देखील आपण निश्चितपणे विजय मिळवू, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.‘सेवा परमो धर्म:’ हे आपल्या देशातील तत्वज्ञान आहे. ‘मनुष्य सेवा हीच ईश सेवा आहे’ असे मानले गेले आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवून निवासी डॉक्टरांनी हे तत्वज्ञान अधोरेखित केले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

No comments