0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी २०२१ या नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.कोरोना संसर्गामुळे २०२० हे संपूर्ण वर्ष जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक होते. परंतु शाश्वत मानवी मूल्ये, कोरोना योद्ध्यांचे कार्य, सेवाभाव तसेच परस्पर स्नेहभावना यामुळे भारतवासियांनी कोरोनाच्या आव्हानाला धैर्याने तोंड दिले. कोरोनाविरुद्ध सावधगिरी बाळगतानाच आगामी वर्षांत आपण देशासाठी, राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेने व समर्पण भावनेने कार्य करण्याचा संकल्प करूया.२०२१ हे वर्ष सर्वांना सुख, समाधान व उत्तम आरोग्य प्रदान करो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

 
Top