web-ads-yml-728x90

Breaking News

‘शिवसंस्कार सृष्टी’ या नियोजित प्रकल्पासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन, महाराजांची शिकवण, आचार-विचार, व्यवस्थापन, बुद्धी-कौशल्य यांचा अनुभव आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देणारा ‘शिवसंस्कार सृष्टी’ हा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात स्थापित करण्यासंदर्भात पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.या प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती सादरीकरणाचा माध्यमातून देण्यात आली. एलईडी स्क्रिन, प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर लाईट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराजांचे जीवन व त्यातून संस्कारांचे दर्शन घडविणारी विविध दालने उपलब्ध असतील. शिवकालीन खेळ, बारा बलुतेदार, घोडस्वारी, योगविद्या, लोककला,आयुर्वेद, तत्कालीन शेती व बियाणे बँक, तत्कालीन आहार पद्धतीचा अनुभव पर्यटकांना देणारा हा प्रकल्प असेल. यातून पर्यटक उत्तम अनुभवासोबतच दांडपट्टा, कुस्ती, तलवारबाजी, घोडसवारी सारख्या साहसांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतील, असे सादरीकरणातून खासदार डॉ.कोल्हे यांनी सांगितले.

No comments