web-ads-yml-728x90

Breaking News

भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर निर्भिड नायक भूमिकेचे प्रशासक

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी

ज्यांनी जन्म दिला आणि ज्यांनी संपुर्ण आयुष्य आपले संगोपण केले अशा आर्इ वडिलांना जेव्हा त्यांचा पुत्र घराबाहेर काढतो किंवा त्यांची देखभाल करत नाही तेव्हा भूधर्तीवर देव हा न्याय देण्यासाठी माणसाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो असे रूप काल भिवंडी येथिल मा.उपविभागीय कार्यालयात दिसले आहे.

         सदर प्रकार हा घरगुती जरी असली तरी न्यायदंडाधिकारी यांचे कार्यालयात जेव्हा सदरहू विषय जातो तेव्हा न्यायदंडाधिकारी हे अन्यायकर्ताला न्याय मात्र मिळवून देतात हे काल निदर्शनास आले आहे.कणखर प्रशासक,कर्तव्यदक्षतेची जाण,निर्भिड बाणा आणि माणूसकीची झरी जपणारे भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांचे दालनात मुलगा विरूध्द वडिल असा अजब दावा दाखल होता.भिवंडी येथिल गोपाळ नगर येथिल 76 वर्षीय वृध्द श्री.दत्तात्रय दामोदर काळे यांनी त्यांचा मुलगा राहूल दत्तात्रय काळे,सुन श्रृती राहूल काळे हे सांभाळ करित नसल्याने त्यांचे विरूध्द मा.भिवंडी उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दावा दाखल केला होता.दिवस उजेडला आणि निर्णय तेही तात्काळ असे घडल्याने प्रशासन आणि प्रशासक नागरिकांच्या सोबत व अन्यायाविरूध्द न्याय मिळवून देणारे आहे हे पुन्हा एकदा भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी सिध्द केले आहे.सुनावणी हि 05/01/2021 रोजी ठेवली आणि सुरूवात झाली तेव्हा दोघांचे म्हणणे भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी यांचे समोर मांडण्यात आले.तेव्हा निर्णय अवघ्या मिनीटातच जाहिर झाला तो म्हणजे असा कि,ज्या आर्इ वडिलांनी जन्म दिले,ज्यांच्या मुळे तुम्ही श्‍वास घेऊन हि दुनिया पाहत आहात,ज्यांनी तुमचे संगोपण केले,तुम्हाला लहाणाचे मोठे करून तुम्हाला शिक्षण देऊन तुम्हाला तुमच्या पायायावर उभे करून समाजात त्यांच्या नावाने तुमची ओळख दिली अशा वडिलांना वृध्द वयात सांभाळण्यास तुम्ही तयार नाहीत,त्यांचे जीवन जगत असताना तुम्हचे कोणतेही धर्म पाळत नाही,त्या वडीलांचे आज रोजी वध्दपकाळात पालनपोषण करण्यास तुम्ही नाकारता परंतु न्यायालय त्यांचे निर्णय देऊन त्यांना न्याय मात्र नक्कीच देणार आणि त्याच सुनावणीत भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी यांनी केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरीकांच्या कल्याणासाठी आर्इ-वडील,ज्येष्ठ नागरीकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 पारीत केला आहे ते अधिनियम महाराष्ट्रात दि.1 मार्च 2009 पासून लागू करण्यात आला असून सदरच्या अधिनियमांतील कलम 7 (2) नुसार पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी(महसुल) यांची नियुक्ती केली असल्याने भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात आर्इ वडिल,ज्येष्ठ नागरीकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 5(1) व कलम 5(3) अन्वये सामनेवाले मुलगा सुन हे एकत्र कुटूंबात राहत असल्याने व वडीलांच्या चरितार्थाची व संरक्षणाची जबाबदारी ही त्यांचे मुलांची असल्याने भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी यांनी अर्जदार वादी श्री.दत्तात्रय दामोदर काळे यांना त्यांचा मुलगा राहुल दत्तात्रय काळे यांनी दरमहा सहा हजार (6000 /-)रूपये रक्कम निर्वाह भत्ता स्वरूपात देर्इल असा आदेश पारीत केला.यावेळी कोर्टात त्या वृध्द वडिल दत्तात्रय काळे यांना भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी यांनी न्याय मिळवून दिल्याने त्यांनी त्यांना आशिर्वाद देऊन आपण माझ्या सारख्या वृध्दाला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी आपले आभारी आहे असे बोलून त्यांचे आनंद अनावर झाले होते.निर्णय सक्षमक आणि तात्काळ मिळण्यासाठी सक्षम अधिकारी नायक भूमिकेत असावा लागतो आणि अशी भूमिका जेव्हा अधिकारी पारीत करून सर्वसामान्यांना न्याय देतात तेव्हा खर्‍या अर्थाने देवाची व्याप्ती माणसारूपीत समाविष्ट झाली असते हे निश्‍चितच.

         अनेक समस्या,तक्रारी,अन्याय,अडचणीवर मात करण्यासाठी अधिकारी जेव्हा नायक भूमिकेतून निर्णय घेतो तेव्हा त्यांचे निर्णय लोकहितातच असते हे आपण जाणतो.अशाच लोकांच्या हितासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नायक भूमिकेत भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी यांचे कार्य ठाणे जिल्हयात पाहायला मिळाले आहे.

         एकीकडे अधिकारी आणि दुसरीकडे न्यायाधिश असतांना एकच बाजू म्हणजे गोरगरिबांची सेवा आणि अन्याय झालेल्यांना न्याय त्यामुळे आज भिवंडी उपविभागीय कार्यालयात त्यांच्याकडे येणारा सर्वसामान्य नागरिक त्यांच्या कुटूंबातील सदस्य आहे असे मानत त्यांच्या स्वतः त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करून रखडलेले काम पुर्णतः मार्गी लावण्याचे मनोध्येय त्यांच्या अंगी राहिले असून त्यांच्या प्रशासकीय सेवेतून माणूसकी जपण्याची झरी जनलोकांना पाहण्यास मिळाली आहे.

         या सुनावणी मध्येही त्यांनी अखेर त्या वृध्दालाच न्याय मिळवून दिला असून आता अनेक वृध्दांना आधार आहे की,आमचे ही असे काही झाल्यास भिवंडी मा.उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर तथा न्यायालयीन न्यायदंडाधिकारी हे आम्हास न्याय देतील असा विश्‍वास बसला तर आपल्या आर्इ वडिलांनाचे संगोपण न करणारे यांनी असा प्रकार घडू नये म्हणून ही शिकवणच एकेप्रकारे मिळाली आहे.तसे दावे दाखल झाल्यास सुनावणी वेळी त्या वृध्दाचेच बाजुने निर्णय लागणार हे मात्र निश्‍चितच समजावे.या सुनावणीवेळी भिवंडी उपविभागीय न्यायालयीन कोर्टात नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी,श्री.दुधसागर भऊसाहेब,अ.का.नानासाहेब राऊत,प्रदीप गवान भाऊसाहेब,सर्व कर्मचारी वर्ग तसेच नागरिक यावेळी उपस्थित होते.

 

No comments