web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मध्ये नेत्र तपासणी यंत्रणा कुचकामी खाजगी रूग्णालयाकडून लुट

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यात शासनाच्या योजना सोयीसुविधा याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष करून खाजगी रूग्णालय विकास कामाची ठेकेदारी शेतकरी योजना यंत्राची खरेदी खाजगी करण झाल्याने रूग्णाची लुट सुरू आहे. दुसरी कडे शेतक-याच्या योजनेत भष्टाचार सुरू आहे मात्र मुरबाडचा विकास जोमाने कार्यरत आहे.                                                    

       मुरबाड ग्रामीण रूग्णालयात नेत्र तपासणी यंत्रणा कुचकामी अपुरी असल्याचा फायदा बाहेरच्या खाजगी कंपन्या ट्रस्टने घेतला असून रुग्णांची तपासणी उपचार यांच्यात लुटमार सुरू आहे. मुरबाड मधील सोनारपाडा येथील इन्फिगो नेत्र तपासणी दवाखान्यात चक्क् बॉडीबिल्ड्र ठेवून रूग्णांना डॉक्टरांना भेटण्यास मज्जाव केला जातो. तपासणी फीस प्रत्येक तिनशे रूपये घेतली जात असुन डॉक्टर् कोण कर्मचारी कोण यांची माहिती मिळत नाही हा रूग्णालय दबंगशाहीचा अड्डा तर नाही ना ? कोणाच्या आशीर्वादाने कोणत्या परवानगीने रूग्णालय वावरतोय यांची सहानिशा केली असता नवी मुंबई येथील इन्फिगो कंपनीची शाखा मुरबाडमध्ये असल्याचे बोलले जात असुन दर्शनीपुलकावर लावलेली डॉक्टराची पाटी वरील डॉक्टर् केव्हा उपलब्ध् असततात यांचा थांगपत्ता नाही.

           शासनाच्या आडमुठ्या धोरणांनी इन्फिगो खाजगी कंपन्यांनी रूग्णांच्या नावाखाली डॉक्टरी दुकाने सुरू केली आहेत हीच दुकाने शासनाने सुरू केली असती तर गोर गरिबाचा फायदा झाला असता पुढा-यांना नेत्रतपासणी शिबीराचा लाभ देवून गोर गरिबाची डॉक्टर् लूट करीत नाही ना ? असा प्रश्न् उद्भवत असून शासनाने ईफगो रूग्णालयांची चौकशी करून शासनाच्या नियमावलित रूग्णांना लाभ द्यावा उपचार द्यावेत बॉडीगार्ड दबंगशाही ग्रामीण जनतेवर लादू नये. सामान्यात उद्रेक होईल यांची काळजी शासनाने घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.   

 

No comments