web-ads-yml-728x90

Breaking News

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन सर्वत्र साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे  कार्य, समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांनी रुजविलेली शैक्षणिक मुल्ये पुढील पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलें यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात, शाळेत क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.

No comments