web-ads-yml-728x90

Breaking News

वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ ठरणार मदतनीस – गृहमंत्री अनिल देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर

वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केले.

पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त (वाहतूक) सर्वश्री सारंग आवाड, विनिता साहू, लोहित मतानी, गजानन राजमाने, विवेक मासाळ, अक्षय शिंदे, निलोत्पल आदी यावेळी उपस्थित होते.

 

No comments