BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर
जागतिक स्तरावर अन्य देश कोरोना नियंत्रणासाठी हतबल झाले असताना भारताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महालसीकरणाला सुरुवात केली आहे. हे सर्व भारतीय जनतेच्या मनामनात असणाऱ्या दयाभाव व सेवावृत्तीमुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
नागपूर येथील राजभवन येथे आयोजित ‘कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसअॅबिलिटी’ संस्थेमार्फत आयोजित कोरोना योद्ध्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे, ‘कॉमनवेल्थ असोसिएशनचे’ अध्यक्ष डॉ.उदय बोधनकर उपस्थित होते.
Post a comment