web-ads-yml-728x90

Breaking News

प्रत्यक्ष जागेवर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविणार - डॉ.मोहन नळदकर ( भिवंडी उपविभागीय अधिकारी)

BY -  युवा महाराष्ट्र लाइव - भिवंडी

----------------------------------------------------

मौजै,घोळगांव येथे एका शेतकर्‍याच्या जमिनीत प्रांताधिकारी व इतर कर्मचारी यांनी भेट दिली असता त्या शेतकर्‍याने स्प्ष्ट सांगितले की त्यांच्या आजोबा नंतर कोणालाही बांध हद्द माहीत नाहीत.ही आश्‍चर्यकारक बाब समोर आली.

 ----------------------------------------------------

सध्या मुंबर्इ वडोदरा,ठाणे-वडपे व इतर प्रकल्पांसाठी भुसंपादनाचे काम युध्दपातळीवर सुरू असून बाधीत शेतकर्‍यांना भूसंपादनाचा मोबदला वाटप करतांना गोळा नंबरचा मोठा अडथळा निर्माण होतो.सदरचे बाधित सर्व्हे नं.हे गोळा नं.प्रमाणे अवार्ड झालेले असल्यामुळे सर्व समाविष्ट खातेदारांपैकी कोणत्या खातेदारांचे किती क्षेत्र संपादित होत आहे हे निश्‍चिीत करण्याचे काम उपअधिक्षक भूमि अभिलेख भिवंडी यांचेमार्फत सुरू आहे.या कामांना गती देण्यासाठी व कामातील अडथळे दूरकरणेसाठी भिवंडी प्रांत अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी स्वतः प्रत्यक्ष जागेवर जाऊन पिंपळस,वडपे,घोळगाव आदी गावांना भेटी दिल्या व शेतकर्‍यांचा अडी अडचणी समजावून घेतल्या.काही शेतकर्‍यांना आपल्या जमिनी कुठे आहेत हे दाखविता आले नाही असे निदर्शनास आले याच वेळी भूसंपादनामार्फत पोटहिस्सा मोजणीच्या कामास भेट देऊन तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी मार्गदर्शन केले.तसेच पोटहिस्सा मोजणी पुर्ण झाल्यास संबंधित शेतकर्‍यांना मोबदला वाटपास कोणत्याही प्रकाराची अडचण येणार नसून या प्रत्यक्ष भेटीने शेतकर्‍यांना दिलासा मिळालाआहे.त्यावेळी भिवंडी उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री.मगर,भुमी अभिलेख विभागाचे उपअधिक्षक श्री.वळवी,श्री.पाटील व त्यासंबंधीत कार्यक्षेत्राचे तलाठी श्री.पाटील हजर होते.अशा या शेतकर्‍यांना दिला देणारे प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी करून शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ पुढाकार घेण्यात येणार असल्याचे भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी सांगितले.याकामी खातेदारांनी आपल्या हद्दी खुणा दाखवून सहकार्य करण्याचे आवाहन भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी केले आहे.

 


No comments