web-ads-yml-728x90

Breaking News

महिला बचत गट यांच्या सहयोगाने सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ पडला पार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कर्जत

शेलू ता. कर्जत येथे के बी के नगर सार्वजनिक उत्सव समिती आणि के बी के नगर महिला बचत गट यांच्या सहयोगाने सार्वजनिक हळदी कुंकू समारंभ पार पडला. ह्या कार्यक्रमात कर्जत खालापूरचे आमदार श्री महेंद्रशेठ थोरवे सपत्नीक उपस्थित होते. त्यांनी आपल्या आमदार फंडातून येथील रस्त्यासाठी ११लाखाचा निधी जाहीर केला.ह्या कार्यक्रमाला भोले बालाजी फौंडेशनचे सर्वेसर्वा श्री निलेशशेठ कोलेकर हे देखील उपस्थित होतो. ह्या कार्यक्रमात आठ भाग्यवान महिला विजेत्यांना पैठणी साडी देण्यात आली.    मनोरंजनाचा भाग म्हणून नटराज डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करत आपली कला सादर केली आणि उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.तसेच अभंगवाणी आणि भक्ती गीत सादरीकरणाचा कार्यक्रम देखील पार पडला. ह्या कार्यक्रमाला स्थानिक महिलांनी उत्साहाने भाग घेतला होता. संपूर्ण कार्यक्रम सोशल डिसटंन्सचे भान ठेऊन पार पडला. आभार प्रदर्शन श्री मनोहर कदम यांनी केले के.बी.के.नगर उत्सव कमिटी खजिनदार संतोष झरेकर सल्लागार रवि वारके, सदस्य बाळकृष्ण कुराडे विकास कांदे ,अंकुश जाधव, संतोष साळुंखे अध्यक्ष नितीन सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले

No comments