web-ads-yml-728x90

Breaking News

6 जानेवारी पत्रकार दिनी श्रमजिवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोर्इर यांनी पत्रकाराना दिल्या सुभेच्छा

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन श्रमजिवी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोर्इर मुरबाड मध्ये पत्रकाराना शुभेच्छा देवुन सत्कार केला.श्रमजिवी संघटना महाराष्ट्रात गोरगरीब वंचित आदिवासी जनतेच्या समस्या संघर्षातुन सोडवुन शासनाच्या विरोधात आंदोलन उपोषणे करून न्याय मिळवुन देतात अशा सर्व सामाजिक उपक्रमात राज्यातील पत्रकाराची श्रमजिवी संघटनेला साथ मिळते त्याच बरोबर मुरबाड मधील पत्रकाराची साथ मिळते अशा शब्दात पत्रकार दिनी शुभेच्छा देताना ठाणे जिल्हयातील जेष्ठ पत्रकार सामाजिक चळवळीत न्यायीक भुमिका लिखाण करणारे नामदेव शेलार यांचा व त्यांच्या सहकार्‍यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

तदनंतर मुरबाड तालुक्यातील कार्यकर्त्याची बैठक घेवुन गांव तालुका कार्यकर्ता अभियान बद्दल मार्गदर्शन केले.आदिवासी गोरगरीब जनतेला वनपट्टे शासनाच्या योजना याचा लाभ देण्यासाठी प्रत्येक गांवात कार्यकर्त्या मार्फत वंचिताना झोन कमेटी अशा अनेक पदाधिकार्‍यांच्या नियुकत्या या अभियानात होणार असुन संघटनेत काम करणार्‍यानी पुढे यांवे असे आहवान केले.यावेळी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी श्रमजिवी संघटनेने पत्रकारांचा सत्कार करून निर्भिड लेखणीची दखल घेतल्याने पत्रकारानी समाधान व्यक्त केला आहे.यावेळी ठाणे जिल्हा कातकरी घटक प्रमुख पंकज वाघ ,तालुका प्रमुख मुकणे,तालुका सचिव महेश वाघ,पत्रकार गौरव शेलार, वसंत भग, मिलींद दळवी,दादा सावंत सह अन्य मान्यवर उपस्थित होते.श्रमजिवीच्या जनसेवेत आमचं नेहमीच सहकार्य राहिल असे आश्‍वसन जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी यावेळी दिले.

No comments