0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे

ठाणे  जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आला. जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा सन्मान  जिल्हाशल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार यांना मिळाला. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी 23केंद्रांवर 1 हजार 826 आरोग्यसेवकांचे लसीकरण आज करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील 23केंद्रांवर  लसीकरण सुरु झाले आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार  प्रत्येक दिवस फक्त 100 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यानुसार आज कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना आरोग्यसेवकांना लसीकरणासाठी बोलविण्यात आले होते . संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 23 केंद्रांवर 1हजार 826 आरोग्यसेवकांना लसीकरण करण्यात आले. हे प्रमाण 79.39 टक्के आहे. ठाणे मनपाच्या 4केंद्रांवर 353, कल्याण डोंबिंवली मनपाच्या 3 केंद्रांवर300, मीरा भाईंदर मनपाच्या 3 केंद्रांवर 268,नवी मुंबई  मनपाच्या 4केंद्रांवर 303, भिवंडी  मनपाच्या 3 केंद्रांवर 184, उल्हासनगर मनपा 1 केंद्रात 71,  ठाणे ग्रामीणच्या 5 केंद्रांवर -347आरोग्यसेवकांना  लस देण्यात आली अशी माहिती जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ अंजली चौधरी यांनी दिली..केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात  येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी.  त्यानंतर तिसऱया टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

 

Post a Comment

 
Top