web-ads-yml-728x90

Breaking News

कोव्हिडं 19 चे सर्व नियम पाळून पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

करोना साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे बंद असणाऱ्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे पालन करून आज पासून सुरू झाल्या असून पहिल्या दिवशी 422 शाळा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा दि.२७ जानेवारी सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या 1346 शाळा आहेत. या शाळा खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद आदी स्वरूपातील व्यवस्थापनाच्या आहेत.आज पहिल्याच दिवशी 345 प्राथमिक शाळा तर 77  माध्यमिक शाळा सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येत आहे.  शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे  तापमान मोजण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यानी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. तसेच शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.. शिक्षकांना देखील खबरदारी म्हणून कोव्हिडं चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. सुरू झालेल्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळानी शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शेषराव बडे  यांनी  दिले आहेत.

 

No comments