BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी
तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल 10 तासानंतर भिवंडीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. पाण्याची कमतरता असल्याने पाणी आणण्यासाठी अग्निशामक दलाला 4 किलो मीटर लांब जावं लागत असल्याने आग विझवण्यात अडळथा निर्माण होत होता. कापडाची कंपनी असल्याने विझलेली आग पुन्हा पेटते आहे. त्यामुळे इथून पुढचे काही तास कुलिंगचे काम सुरु राहील . आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झालेला आहे. ही कंपनी दोन मजली आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. परंतु आगीची तीव्रता इतकी होती की तिने अग्र स्वरुप धारण करत संपूर्ण इमारतीवर ताबा मिळवला. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Post a comment