0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक प्राप्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून आणखी एकास अटक करण्यात आली. योगेश जगदीशप्रसाद कनोडिया असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

योगेश कनोडिया याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून वस्तू व सेवा कर कायदा २०१७, च्या कलम ६९ अन्वये बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी कांदिवली (पूर्व), मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने योगेश कनोडिया यांना दि. १३ जानेवारी, २०२१ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कनोडिया याने मे.यश फैब्रिक्स, मे. श्री.गणेश टेक्सटाईल, मे.जे.के फॅब्रिक्स व मे.क्रिष्णांश इंटरप्रायजेस, या नावे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. मात्र नोंदणी करताना खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक प्राप्त केले. तसेच नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्री व्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित केले. योगेश कनोडिया याने दिलीप टिबरेवाल यांच्याकडून रू.१७५ कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू.११.५४ कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला. दिलीप टिबरेवाल या व्यक्तीस वस्तू व सेवा कर विभागाने या पूर्वीच खोटी देयके निर्गमित करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Post a comment

 
Top