0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गायीची सेवा आणि संवर्धन करण्याचे कार्य अनेक व्यक्ती आणि संस्था करीत असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.गऊ भारत भारती साप्ताहिकाचे संपादक संजय अमान यांच्या वतीने गऊ भारत भारती सन्मान, गऊ भारत भारती विशेष सन्मान पुरस्कार प्रदान आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार राजभवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी गऊ भारत भारती साप्ताहिकाचे प्रकाशन आणि ‘जर्नी टू नो-थींग’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, गंगा, गीता आणि गायत्री हा भारताचा मूलमंत्र आहे. गोमातेच्या सन्मानाची परंपरा आहे. गायीची सेवा करणे ही श्रद्धेची भावना असून गायीच्या जतन व संवर्धनासाठी गऊ भारत भारती चांगले कार्य करीत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनासारख्या महामारीशी आपण संघर्ष करीत आहोत. कोरोनाचे संकट संपूर्ण गेले नसून अद्यापही खबरदारी बाळगायला हवी. आतापर्यंत सर्व भारतीयांनी कोरोनाचा योग्यरित्या सामना केला आहे. यामुळे आपण कोरोनावर नक्कीच विजय मिळवू, असा विश्वासही श्री.कोश्यारी यांनी व्यक्त केला.

Post a comment

 
Top