रिलायन्स इंडस्ट्रि ली. कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या लोकशासन आंदोलनाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती
BY - युवा महाराष्ट्र लाईव - रायगड
स्वराज्य प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने दिनांक १३ डिसेंबर २०२० रोजी मौजे नागोठणे ते मौजे चोळे येथील भागात रिलायन्स इंडस्ट्रि ली. कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या लोकशासन आंदोलन संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.
त्यावेळी संघटनेचे संस्थापक मा. भास्करभाई कारे यांनी पाठिंबा देताना म्हणाले जोपर्यंत इथल्या भूमीपुत्रांच्या मागण्या मंजूर होत नाही व न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही भूमीपुत्रांसाठी लढत राहणार. येतील मॅनेजमेंट कंत्राटी कामगार, सेवा निवृत्त कामगार, सुशिक्षित बेरोजगार यांचे प्रश्न निकाली लावत नाही तोपर्यंत लढत राहणार.
तसेच संघटनेचे युवक आणि युवती यांनी संघटना ही गोरगरीब जनतेच्या हितासाठी नेहमी कार्यरत राहणार व मातीसाठी सदैव काम करत राहणार असे म्हणत भूमिपुत्रांना साथ देत पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे मा. राज्य मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड म्हणाले, स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेने दिलेल्या प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांच्या आंदोलनात आम्ही त्याच स्वागत करतो आणि हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही . स्वराज्य प्रतिष्ठाण रायगड या लढ्यात उतरून लढा आणखीन मजबूत केला त्याबद्दल ऋण व्यक्त गेले. तसेच लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याने व प्रकल्पग्रस्त मायमावळ्यांनी संघटनेचे मनापासून ऋण व्यक्त गेले.
तसेच न्यायमूर्ती मा. बी. जी. कोळसे पाटील साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन करत हा लढा आणखी तीव्र करणार असे सांगितले.
सरतेशेवटी स्वराज्य प्रतिष्ठान रायगडचे संस्थापक मा. भास्करभाई कारे व संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा पत्र देत आम्ही ह्या लढ्यात शेवट पर्यंत असणार असे सांगितले.
No comments